नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून जिल्हा प्रशासन सर्व जीवनावश्यक सेवा चालू ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशावेळी काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर वाहनाद्वारे फिरत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे बिनकामी फिरणारे वाहन चालकांवर गुन्हे दाखल करुन सदरील वाहने तीन महिन्यांसाठी जप्त करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
गरज नसताना फिरणारे वाहने तीन महिन्यासाठी जप्त - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर - nanded collector
काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर वाहनाद्वारे फिरत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे बिनकामी फिरणारे वाहन चालकांवर गुन्हे दाखल करुन सदरील वाहने तीन महिन्यांसाठी जप्त केले जाणार आहे.
![गरज नसताना फिरणारे वाहने तीन महिन्यासाठी जप्त - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर nanded police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6640391-503-6640391-1585878533793.jpg)
पत्रकारांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर व जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर म्हणाले की, शहर व जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुख्य रस्ते सिल केलेले आहेत. तरीही काही नागरिक विनाकारण वाहनावर फिरुन गर्दी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आजपासून अशा वाहन चालकांवर गुन्हे दाखल करुन त्यांची वाहने तीन महिन्यांसाठी जप्त करण्याची मोहिम आजपासून प्रशासन नाईलाजास्तव अंमलात आणत आहे. जिल्ह्यात महसूल, पोलीस, मनपा, आरोग्य विभाग, सफाई कामगार असे मिळून जवळपास दहा ते बारा हजार अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत.
या प्रयत्नांना नागरिकांनी घरा बाहेर न पडता सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्याळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.