महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Savarkar Controversy : वीर सावरकरांनी आपल्या क्रांतिकारी कृत्याबदल कधी माफी मागितली नाही - प्रा. शेषराव मोरे - Professor Seshrao More

सावरकरांनी (Controversy Against Sawarkar) माफी मागण्यासाठी कधीही ब्रिटीश सरकारकडे अर्ज (Veer Sawarkar never apologized for his revolutionary) केला (Veer Sawarkar Amnesty Application ) नाही. राज्यात सावरकर माफीनाट्यावरून बरेच रणकंदन माजले आहे. 'Etv भारत 'शी बोलताना प्रा. शेषराव मोरे म्हणाले, सावरकरांना १९१० मध्ये दुहेरी जन्मठेप झाली. (Seshrao More on Sawarkar Controversy) Latest news from Nanded, Nanded Update

Sawarkar Controversy
प्रा. शेषराव मोरे

By

Published : Nov 20, 2022, 3:26 PM IST

Updated : Nov 20, 2022, 5:27 PM IST

नांदेड :देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या क्रांतिकारी कृत्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Controversy Against Sawarkar) माफी मागण्यासाठी कधीही ब्रिटीश सरकारकडे अर्ज (Veer Sawarkar never apologized for his revolutionary) केला (Veer Sawarkar Amnesty Application ) नाही. कायद्यानुसार उर्वरित शिक्षेसाठी सूट मिळावी यासाठी त्यांनी अर्ज केला. त्यांचे विरोधक त्यांना निष्कारण माफीवीर असे म्हणत हेटाळणी करतात, अशी माहिती गाढे अभ्यासक व अंदमान येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे (Seshrao More on Sawarkar Controversy) यांनी दिली. Latest news from Nanded, Nanded Update

प्राध्यापक शेषराव मोरे यांचे सावरकरांविषयी स्पष्टीकरण

अर्ज शिक्षेत सूट मिळविण्यासाठी, माफीसाठी नव्हे-राज्यात सावरकर माफीनाट्यावरून बरेच रणकंदन माजले आहे. 'Etv भारत 'शी बोलताना प्रा. शेषराव मोरे म्हणाले, सावरकरांना १९१० मध्ये दुहेरी जन्मठेप झाली. अंदमानची शिक्षा इतकी कठोर होती की, त्या जेलमधील अनेक कैद्यांनी आत्महत्या केली. सावरकरांच्या मनातही आत्महत्येचा विचार आला; पण त्यांनी स्वत:ला दूर ठेवले. कैद्यांनी कायद्यानुसार शिक्षेसाठी सूट मागावी, उर्वरित आयुष्यात देशकार्य करावे असे त्यांना वाटत असे. सावरकरांनी १९११ ते १९१८ पर्यंत पाच अर्ज केले. त्यात केलेल्या क्रांतिकारी कृत्यासाठी माफी नव्हती. उर्वरित शिक्षेसाठी सूट मागितली होती. परंतु त्या अर्जाच्या विरोधात अभिप्राय जात असत. त्यामुळे त्यांची सुटका झाली नाही,असे मोरे यांनी सांगितले.

अर्ज राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी -इतर कैद्यांना सोडण्याचा आग्रह सावकरांनी केलेले अर्ज स्वतःच्याच सुटकेसाठी नव्हते. अंदमानातील राजकीय कैद्यांच्या सुटकेसाठी त्यांनी अर्ज केले. १९१४ मध्ये त्यांनी केलेल्या अर्जांत लिहिले होते की, शासनाला असे वाटत असेल माझे हे स्वत:ची सुटका करावी, यासाठी आहे तर मला मुळीच सोडू नये. माझ्याशिवाय अन्य सर्वांना सोडून द्या. यामुळे मला अत्यानंदच होईल. १९१७ च्या अर्जात लिहिले होते की, सर्वांची सुटका करण्यासाठी माझा अडथळा येत असेल राजक्षमेतून माझे नाव वगळून टाकावे. अन्य सर्वांची सुटका करावी. त्यामुळे मला माझीच सुटका झाल्याचे समाधान मिळेल. १९२० च्या अर्जात त्यांनी लिहिले होते की, शेकडो राजकीय कैद्यांना मुक्त करून शासनाने माझ्या १९१४ ते १९१८ या कालावधीतील आवेदनांची काही प्रमाणात पूर्तता केल्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो. राजक्षमेसाठी अर्ज करण्यास कोणी तयार नसे. ही शरणागती ठरेल असे मानले जात असे. परंतु सावरकर त्यांना पटवून देत की, पुन्हा राज्यक्रांतीचा प्रयत्न वा राजद्रोह करणार नाही, अशी अट मान्य करून सुटका करून घेणे हेच राष्ट्रहिताचे आहे. येथे सहत राहणे व मरून जाणे यात राष्ट्रहित नाही. या भूमिकेत चूक काय आहे, असा प्रश्नही मोरे यांनी उपस्थित करत सध्या देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर खेद व्यक्त केला.

सावरकरांनी आपल्या आत्मचरित्रात काहीच लपवले नाही :त्यांचे माफी नामे आम्ही शोधून काढले असा दावा त्यांचे विरोधक करतात, हेही साफ आहे. १९२३ साली लिहिलेल्या अंदमानच्या अंधेरीतून या पुस्तकात त्यांनी दयेच्या अर्जाबाबत विस्तृत माहिती दिली. माझी जन्मठेप या आत्मचरित्रातही त्यांनी दयेच्या अर्जाबाबत सर्व विस्तृत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी काहीही लपवले नाही. सावरकरांनी दयेचा अर्ज करून शिवाजी महाराजांप्रमाणेच ब्रिटिश सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामागे राष्ट्रभक्तीच होती. स्वतःचे हित नव्हते. सुटका झाल्यानंतरही त्यांनी प्रपंच केला नाही. तर समाज व राष्ट्रकार्यच केले असेही प्रा. मोरे 'Etv भारत'शी बोलताना म्हणाले.

Last Updated : Nov 20, 2022, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details