महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमआयएम आणि 'वंचित'च्या काडीमोडास इम्तियाज जलील कारणीभूत - प्रकाश आंबेडकर - औरंगाबादचा खासदार

ज्या भाजप-सेनेच्या विरोधात आपण लढतोय त्यांनाच विधानपरिषदेत मतदान केल्याने माझे कार्यकर्ते उद्विग्न झाले आहेत. त्यामुळे ओवैसी यांचा निवडून आलेला खासदार आणि त्याचे काही साथीदार ओवैसींचा वापर करत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली.

VBA prakash ambedkar

By

Published : Oct 13, 2019, 8:56 AM IST

नांदेड - एमआयएम आणि वंचितची आघाडी तुटण्यास इम्तियाज जलील कारणीभूत असल्याची टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जलीलांचे नाव न घेता केली. नांदेडमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. आंबेडकरांनी औरंगाबादमधील विधानपरिषदेच्या निवडणुकीचा हवाला देत मुस्लीम समाजाने नेमके हे चाललंय काय ते समजून घेण्याचे आवाहन केले. ओवैसी यांचा जलील आणि इतरांनी वापर केल्याची टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा -कोणाशीही निष्ठा न बाळगणारा उमेदवार निष्ठावंत कसा; किन्हाळकरांचा भाजपला खडा सवाल

ओवैसी हे चांगले व्यक्ती आहेत, पण औरंगाबादचा खासदार आणि काही मंडळी त्यांचा वापर करत असल्याची टीका आंबेडकरांनी केली. मुस्लीम समाजाने चालत असलेल्या या प्रकाराकडे डोळसपणे पहावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. औरंगाबाद विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपल्या लोकांना भाजप-सेनेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी राज्यातील एमआयएमच्या नेत्यांनी सांगितले की, हैदराबादच्या नेत्यांनी याचा खुलासा येथील मुसलमान विचारणार आहेत की नाही? असा सवाल त्यांनी सभेत उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकर

हेही वाचा -गेल्या पाच वर्षात भाजपने केवळ विविध धर्मांत तेढ निर्माण केली - अशोक चव्हाण

ज्या भाजप-सेनेच्या विरोधात आपण लढतोय त्यांनाच विधानपरिषदेत मतदान केल्याने माझे कार्यकर्ते उद्विग्न झाले आहेत. त्यामुळे ओवैसी यांचा निवडून आलेला खासदार आणि त्याचे काही साथीदार ओवैसींचा वापर करत असल्याची टीका आंबेडकर यांनी केली आहे. नांदेडच्या या सभेला मोठी गर्दी जमली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details