महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक; निर्बंध केले शिथिल

शासनाने नांदेड जिल्ह्याचा कोविड निर्बंध उठविण्याच्या पहिल्या स्तरामध्ये समावेश केला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवडक सेवा, आस्थापना व उपक्रमांना मर्यादेत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्तर एक नुसार निर्बंध शिथिलीकरणाबाबत त्यांनी पुढील आदेश दिले आहेत.

Unlocked from Monday in Nanded
Unlocked from Monday in Nanded

By

Published : Jun 6, 2021, 7:43 PM IST

नांदेड -जिल्ह्यातील कोविड बाधितांचे प्रमाण शासन आणि नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे सद्यस्थितीत नियंत्रणात आले आहे. याचबरोबर कोविड उपचारात ऑक्सिजन बेड्सचे प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्यातील ही आकडेवारी लक्षात घेवून शासनाने नांदेड जिल्ह्याचा कोविड निर्बंध उठविण्याच्या पहिल्या स्तरामध्ये समावेश केला आहे. यामुळे जिल्ह्यातील निवडक सेवा, आस्थापना व उपक्रमांना मर्यादेत सूट देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला. स्तर एक नुसार निर्बंध शिथीलीकरणाबाबत त्यांनी पुढील आदेश दिले आहेत.

लग्न समारंभासाठी शंभर व्यक्तींची मर्यादा -

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय व सूट असलेल्या खासगी कार्यालये हे शंभर टक्क्यांसह सुरु राहतील. खेळ क्रिडा प्रकार नियमित सुरु राहतील. धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक / करमणुकीचे कार्यक्रम / मेळावे यांना नियमित सुरु ठेवण्यास सुट दिली आहे. जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट्स, मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रिनसह), नाट्यगृह नियमित सुरु राहतील. लग्न समारंभाला शंभर व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलींग नियमित सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा, अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा नियमित सुरु राहतील.

बैठका, सर्वसाधारण सभा नियमितपणे होतील -

विविध बैठका, निवडणूक - स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा यांना नियमितप्रमाणे होतील. जिल्ह्यातील बांधकाम नियमितप्रमाणे करता येईल. कृषि व कृषि पुरक सेवा, ई-कॉमर्स, वस्तू व सेवा नियमित सुरु राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियमितप्रमाणे निर्बंधाविना सुरू राहतील.

नियम-अटींसह खासगी वाहतुकीलाही सूट-

मालवाहतूक ( जास्तीत जास्त तीन व्यक्ती,चालक /मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमित सुरु राहतील. खाजगी वाहने/ टॅक्सी/बसेस/लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरु राहतील. परंतु, स्तर पाचमध्ये जाण्यासाठी किंवा स्तरमध्ये थांबा घेवून पुढे जाणाऱ्या प्रवाशांना ई-पास आवश्यक राहील.

उद्योगक्षेत्र, लघु व मध्यम उद्योगासह युनिट्स नियमित सुरु राहतील -

उत्पादक घटक (निर्माणक्षेत्र) अंतर्गत निर्यात जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आवश्यकता असलेली उद्योगक्षेत्र, लघु व मध्यम उद्योगासह युनिट्स नियमित सुरु राहतील.

निर्माणक्षेत्र यात
अ] अत्यावश्यक वस्तू निर्माण करणारे उद्योग

ब ] सातत्याने व निरंतर चालु असणारी उद्योगक्षेत्र

क] राष्ट्रीय सुरक्षे करिता आवश्यक संसाधनांची निर्मिती करणारे उद्योग

ड] डाटा सेंटर, क्लाउड सर्विसेस, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र इत्यादी व इतर सर्व निर्माण क्षेत्र जे अत्यावश्यक तसेच निरंतर उद्योग या सदराखाली समाविष्ट नाहीत ते सर्व नियमितपणे सुरु राहतील.

व्यायामशाळा, केशकर्तनालयही सुरू होणार -

व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स हे नियमित सुरु राहतील. अंत्यविधी, अंतयात्रेसाठी 50 व्यक्तींचे निर्बंध घालण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details