नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अशोक चव्हाण, शनिवारी सकाळी नांदेड शहरात अॅक्शन मूडमध्ये दिसले. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना रस्त्याजवळ काँग्रेसचाच एक अनधिकृत बॅनर दिसला. चव्हाण यांनी लगेच आपला ताफा थांबवून तो बॅनर स्वतः काढून टाकला.
अशोक चव्हाणांनी स्वतः हटवले अनधिकृत बॅनर हेही वाचा... बंडखोरांची 'स्थानिक आघाडी' वाढवणार महाविकास आघाडीची डोकेदुखी
नांदेड शहरात यापुढे अनधिकृत बॅनर लावू देणार नसल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विदृपीकरण झाले आहे. त्यामुळे चव्हाण यांनी स्वतः पासून सुरुवात केली. त्यांनी आपल्याच पक्षाचा बॅनर हटवला आहे. कोणीही अनाधिकृत बॅनर लाऊ नये, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.
हेही वाचा... 'मला जर बेळगावमध्ये येण्यापासून रोखायचे असेल तर कायद्याने रोखावे'
दरम्यान, नांदेड मनपात काँग्रेसची एकहाथी सत्ता आहे. मात्र तरीही महानगरपालिका अकार्यक्षम बनल्याचे दिसत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बॅनर लावले जात असतात. या अनाधिकृत बॅनरमुळे शहरात अनेकदा अपघात देखील होत असतात. स्वतः चव्हाण यांनी या प्रकाराची दखल घेऊन स्वतःच्या पक्षाचा बॅनर हटवला. त्यानंतर झोपलेल्या मनपाला प्रशासनाला देखील जाग आली.