नांदेड- शेतकऱ्यांनी धीर सोडू नये शिवसेना त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, असा दिलासा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
हेही वाचा -शेतकरी दुहेरी संकटात: ओल्या कापसाला २५ रुपये किलो भाव, कापूस वेचण्यास मजूर मिळेनात
परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. लोहा तालुक्यात जानापुरी, आंबेसांगवी तर कंधार तालुक्यात कीरोडा, घोडज, या गावातील शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी भेटी दिल्या. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
हेही वाचा -शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मंगळवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; नुकसानग्रस्त शेतीची करणार पाहणी
यावेळी ठाकरे यांनी तत्काळ मदत केंद्र सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रमुखांना दिले आहेत. पीक विमा, बँकांशी संबंधित अडचणी आणि प्रशासकीय अडचणी मदत केंद्राच्या माध्यमातून सोडवाव्यात, अशा सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.