नांदेड -मुखेड शहरातील अशोकनरगर येथील घरातील शौचालयाचे सेफ्टी टँक साफ करताना नागेश घुमलवाड (वय २५) व मारोती चोपलवाड (वय ३०) या दोन युवक कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मुखेड शहरातील अशोक नगर येथील प्रा. तुकाराम सुर्यवंशी यांच्या घरातील शौचालयाचा टॅंक साफ करण्याचे काम पाच कामगारांनी घेतले होते. दुपारी येऊन सेप्टी टँकमध्ये केमीकल पावडर टाकले व रात्री साडे दहाच्या दरम्यान टँकमध्ये शिडीच्या मदतीने नागेश घुमलवाड खाली उतरले. ते टँकमधील भिंतीवर थांबले असता अचानक खाली कोसळून पडले असल्याचे मारोती चोपलवाड यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी तेही खाली उतरले. मात्र तेदेखील खाली पडले. या दोघांनाही काढण्यासाठी ऊर्वरित तीन कामगारांनी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत त्यांचा गुदमरून मृत्यु झाला होता.