नांदेड- शहरातून २ तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात विमानतळ आणि भाग्यनगर पोलिसात हरविल्याची नोंद दाखल करण्यात आली आहे. श्रद्धा देवीदास राठोड (वय १९) आणि रुपाली उत्तम पुंडगे (१८) अशी बेपत्ता तरुणींची नावे आहेत.
नांदेड शहरातून २ तरुणी बेपत्ता; पोलिसात तक्रार नोंद - Nanded City News
नांदेड शहरातून २ तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. श्रद्धा देवीदास राठोड आणि रुपाली उत्तम पुंडगे अशी बेपत्ता तरुणींची नावे आहेत.
नांदेड तालुक्यातील नेरली येथील रहिवासी रुपाली पुंडगे ही तरुणी १५ जून रोजी सकाळी ५.३० वाजता घरी कोणालाही न सांगता बाहेर निघून गेली. नातेवाईक व अन्यत्र ठिकाणी शोध घेऊनही ती सापडली नाही. म्हणून पुष्पाबाई पुंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ५ ऑगस्ट रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात रुपाली हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास आर. एम. श्रीरामे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत सांगवी भागातील शिवनेरीनगरमधील रहिवासी श्रद्धा राठोड ही तरुणी ३० जुलै रोजी सकाळी ११.५० वाजता राहत्या घरुन ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती आणखी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला. तरीही ती न सापडल्याने वडील देवीदास यांनी ३१ जुलै रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात श्रद्धा हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रार नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार पावडे करीत आहेत.