नांदेड : शहराजवळील कंधार मन्याड नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने व कमी पोहता येत असल्याने नदीपात्रात बुडून मृत्यू ( Death of students in Manyad river basin ) झाल्याची घटना 22 मे रोजी रविवारी दुपारी घडली यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
नदीत पोहताना अंदाज चुकला : कंधार शहरातील सौरभ सतीश लोखंडे (वय 16, रा. लॉ कॉलेजजवळ कंधार) व त्याचा मित्र ओम राजू काजळेकर (वय 15, रा. गवंडीपार कंधार) असून हे दोघेही 22 मे रोजी दुपारी दोन ते अडीचदरम्यान स्वप्नील पाटील लुंगारे यांच्या शेताच्या शिवारात दक्षिणेस तीन कि.मी. मन्याड नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. ते पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि नदीपात्रात गाळ साचल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशी माहिती त्यांच्या सोबत असणारा मुलगा बालाजी तुकाराम डांगे (रा. रंगारगल्ली कंधार) यांनी त्यांच्या घरी जाऊन दिली. तत्काळ त्या ठिकाणी ओमचे वडील राजू काजळेकर हेदेखील आले होते.