महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये ट्रकची दुचाकीला धडक, दोघे जागीच ठार - two killed in nanded

नांदेड-नागपूर महामार्गावर (क्र- एम.एच.३८ ए ४३१०) ही मोटारसायकल नांदेडकडे येत असताना भरधाव वेगातील ट्रकने (क्र.एम. पी.०९, ए. एच.०९२८) दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील बालाजी नामदेव इमने (वय-२१ व रा. तरोडा खु. ता.हदगाव) व अन्य एक असे दोघे जण जागीच ठार झाले आहेत.

two killed in truck bike accident in nanded
नांदेडमध्ये ट्रकची दुचाकीला धडक, दोघे जागीच ठार

By

Published : Aug 26, 2020, 2:24 PM IST

नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर शहराच्या वळण मार्गावर भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला चिरडल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना आज दि. २६ ऑगस्टला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेची महामार्ग पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी, की नांदेड-नागपूर महामार्गावर (क्र- एम.एच.३८ ए ४३१०) ही मोटारसायकल नांदेडकडे येत असताना भरधाव वेगातील ट्रकने (क्र.एम. पी.०९, ए. एच.०९२८) दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील बालाजी नामदेव इमने (वय-२१ व रा. तरोडा खु. ता.हदगाव) व अन्य एक असे दोघे जण जागीच ठार झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details