नांदेड- जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील टाकळी शिवारात वीज पडून वयोवृद्ध शेतकरी आणि त्यांचा नातू मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये शेतकरी चंदर रेड्डी ( वय 70) नातू योगेश गोपाळ रेड्डी (वय-15) यांचा मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्ये वीज पडून आजोबा-नातवाचा मृत्यू - नांदेडमध्ये जोरदार पाऊस
चंदर रेड्डी यांचे टाकळी-मरखेल शिवाराच्या सीमेजवळ शेत आहे. गेल्या 15 दिवसापासून परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे सोयाबीनची राखण करण्यासाठी चंदर रेड्डी व त्यांचा नातू संध्याकाळी शेतात गेले होते.
हेही वाचा -'येलदरी धरणाच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कालव्यांची दुरुस्ती करा'
चंदर रेड्डी यांचे टाकळी-मरखेल शिवाराच्या सीमेजवळ शेत आहे. गेल्या 15 दिवसापासून परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे सोयाबीनची राखण करण्यासाठी चंदर रेड्डी व त्यांचा नातू संध्याकाळी शेतात गेले होते. जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे ते शेतातील आखाड्यावर बसले होते. त्यावेळी चंदर रेड्डी आणि त्यांचा नातू योगेश रेड्डी यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोघांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून शनिवारी दुपारी उशिरा टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.