नांदेड - राज्यात कोरोनाच्या प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. नांदेड जिल्ह्यातली गुरूवारी 250 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये 118 जणांचे आरटीपीसीआर, 132 जणांचे रॅपिड ॲटिजेन करण्यात आली. तसेच 83 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
38 बाधितांची प्रकृती अतीगंभीर -
आजच्या 1 हजार 560 अहवालापैकी 1 हजार 253 अहवाल निगेटीव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 25 हजार 440 एवढी झाली असून यातील 23 हजार 204 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 1 हजार 413 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 38 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. गुरुवार 11 मार्च रोजी पिरबुऱ्हानगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 608 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.