नांदेड - दक्षिण मध्य रेल्वेने उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीकरता उत्सव विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यापैकी काही उत्सव विशेष गाड्यांमध्ये प्रवाशी संख्या अत्यंत कमी असल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या वतीने देण्यात आली.
०७६१३ व ०७६१४ नांदेड-पनवेल-नांदेड या उत्सव विशेष गाड्यांना प्रवाशांच्या मागणीवरून आणखी ८ दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुदत वाढवलेल्या गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे -
१. गाडी संख्या ०७६१४ नांदेड-पनवेल-नांदेड ही गाडी २३ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात आली होती. परंतु, जनतेच्या मागणीवरून या गाडीची मुदत दिनांक २३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.
२. गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड ही गाडी २४ नोव्हेंबरपासून रद्द करण्यात आली होती. परंतु, जनतेच्या मागणीवरून या गाडीची मुदत दिनांक २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. या विशेष रेल्वेंचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंह यांनी केले आहे.