नांदेडमध्ये मंगळवारी आढळले कोरोनाचे दोन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 195 वर - nanded covid 19 patient
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 195 वर पोहोचली आहे. मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 30 पैकी 29 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे.
![नांदेडमध्ये मंगळवारी आढळले कोरोनाचे दोन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 195 वर nanded civil hospital](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-08:05-mh-ned-01-nandedmadhyepunha2coronapositive-foto-7204231-10062020070234-1006f-1591752754-758.jpg)
नांदेड - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात आणखी भर पडली आहे. मंगळवारी सांयकाळी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. दररोजच्या तुलनेत दिलासादायक स्थिती होती. मात्र, रात्री 11 च्या दरम्यान आणखी 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 195 वर पोहोचली आहे. मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 30 पैकी 29 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे.
रात्री आलेल्या 11 अहवालांमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामध्ये नायगाव तालुक्यातील तकबीड येथून असून या रुग्णाचे वय हे 47 वर्षे इतके आहे. तर नांदेड येथील चौफला येथील 50 वर्षीय महिला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. या दोन्ही रुग्णांवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 195 इतकी झाली. कोरोनामुक्त 134 तर 52 रुग्ण उपचार तर आतापर्यंत 9 जण या संसर्गामुळे दगावले आहेत.