नांदेड - आयपीएलमध्ये शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना खेळला गेला. शहरातील नवा मोंढा परिसरात या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या दोन आरोपींकडून १० हजार ४०० रुपये व इतर साहित्य असा एकूण ६१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नवा मोंढा परिसरात हरिसिंह परमार यांच्या मोकळ्या जागेवर १७ ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशिष बोराटे यांनी छापा टाकला. यावेळी हरिसिंह परमार व राहुल श्रीमाळ हे दोघे एका अॅपवर सट्टा लावताना आढळले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १० हजार ४०० रुपये, लॅपटॉप, ६ मोबाईल असा एकूण ६१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
नांदेडात क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक - नांदेड लेटेस्ट न्यूज
नवा मोंढा परिसरात हरिसिंह परमार यांच्या मोकळ्या जागेवर १७ ऑक्टोबरला राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशिष बोराटे यांनी धाड टाकली.
नांदेड
दरम्यान, आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू झाल्यापासून सट्टा लावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सट्टा लावल्याप्रकरणी मुंबईतून काही जणांना अटक करण्यात आली होती.