महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलाने घातली लग्नाची मागणी, नंतर बापाने धरला महिलेचा हात; बाप-लेकाविरुद्ध नांदेडात गुन्हा दाखल - sumedh bansode

घरी बोलावून महिलेला लग्नाची मागणी घातली, तिने नकार दिल्यानंतर तिला बेदम मारहाण करणाऱ्या बाप-लेकाविरुद्ध नांदेडमधील इतवारा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतवारा पोलीस ठाणे

By

Published : May 13, 2019, 10:20 AM IST

Updated : May 13, 2019, 10:26 AM IST

नांदेड- एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी बाप-लेकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या शहरातील मणियार गल्लीतील रहिवासी साजीद अब्दुल हमीद कुरेशी याने बळीरामपूर भागातील एका महिलेला आपल्या घरी बोलावले होते. ही महिला त्याच्या घरी गेली असता त्याने मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे. म्हणून वाईट हेतूने हात धरुन विनयभंग केला. तसेच तेवढ्यात त्याचे वडील अब्दुल हमीद कुरेशी तेथे आले. त्यानेही जबरीने तिचा हात धरला. तिला मारहाण करुन शिवीगाळ करीत लग्न केले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली.

इतवारा पोलीस ठाणे


या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सुरु आहे.

Last Updated : May 13, 2019, 10:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details