महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात तूर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात - Nanded District Latest News

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यात तूर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 8 केंद्रांवर तुरीची नोंदणी केली जाणार आहे. खासदार हेमंत पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता, त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, तूर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात तूर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात
नांदेड जिल्ह्यात तूर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

By

Published : Jan 17, 2021, 3:33 PM IST

नांदेड - केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यात तूर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण 8 केंद्रांवर तुरीची नोंदणी केली जाणार आहे. खासदार हेमंत पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता, त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, तूर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

खरीप हंगामात तुरीचे चांगले उत्पादन

यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे तुरीला योग्य भाव मिळावा यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केला होता, त्यांच्या प्रयत्नातून नांदेड जिल्ह्यात 8 ठिकाणी तूर नोंदणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान तूर नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी करता खरीप हंगाम २०२०-२१ मधील पीकपेरा, ऑनलाईन ७/१२, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स सोबत आणावी. तसेच बँक पासबुकवर शेतकऱ्याचे नाव खाते क्रमांक आयएफएससी कोड स्पष्ट असावा, जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

खरेदी केंद्रांचा तपशील पुढीलप्रमाणे

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सहकारी खरेदी विक्री संघ म.हदगाव येथे केंद्र चालक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट आणि तालुका कृषी प्रक्रिया संस्था गणेशपूर येथे केंद्र चालक तिरमनवार, विदर्भ को- ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. अंतर्गत सरसममध्ये सरसम ऍग्रो प्रोड्युसर कंपनी येथे केंद्र चालक दमकोंडवार तर इतर ठिकाणी महा फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत हदगाव तालुक्यातील तळणी येथे तावडे फार्मर प्रोड्युसर कंपनी केंद्र चालक विजय लोखंडे, निवघा बाजार येथे शेवंतामाता फार्मर प्रोड्युसर कंपनी केंद्र चालक गजानन शिंदे, सरसम येथे पारडी रेणुका फार्मर कंपनी केंद्र चालक सदशिव पतंगे, किनवट येथे किनवट परिसर शेतकरी प्रोड्युसर कंपनी केंद्र चालक श्रीकांत पुरेवार यांच्याशी तुरीची नोंदणी करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details