महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Truck Auto Accident : ट्रक व ऑटोचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू - Accident on Degalur Hyderabad highway

हैदराबादहून गुजरातकडे येणारा ट्रक (GJ 15 AT 1376) व चुकीच्या दिशेने देगलूरहून बिचकुंदाकडे जाणारा ऑटो (TS 16 UB 5701) यांची समोरासमोर जोरदार टक्कर सोमवार दुपारी 4 च्या सुमारास ( Truck and Auto Accidents in Deglur ) झाली. त्यामध्ये ऑटोमध्ये बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ( Five People Died in Accident Deglur )

Accident on Degalur Hyderabad highway
ट्रक व ऑटोच्या भीषण अपघात

By

Published : Jul 19, 2022, 5:12 PM IST

Updated : Jul 19, 2022, 7:16 PM IST

देगलूर (नांदेड) - देगलूर -हैदराबाद महामार्गावर देगलूरपासून ( Accident on Degalur Hyderabad highway ) 12 किमी अंतरावर तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील मेनूर गावाजवळ ट्रक व ऑटो यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघात ( Truck and Auto Accidents in Deglur ) झाला. यात ऑटोमधील ड्राइवरसहित पाच जणांचा जागीच मृत्यू ( Five People Died in Accident Deglur ) झाला. दरम्यान घटना स्थलावरून ट्रक चालक फरार झाला आहे.

5 जणांचा जागीच मृत्यू - सोमवार दुपारी 4 च्या सुमारास हैदराबादहून गुजरातकडे येणारा ट्रक (GJ 15 AT 1376) व चुकीच्या दिशेने देगलूरहून बिचकुंदाकडे जाणारा ऑटो (TS 16 UB 5701) यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. त्यामध्ये ऑटोमध्ये बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून ते पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी बांसवाडा येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

महामार्गावर होतायेत दुर्घटना - या भीषण अपघातात ऑटोमधील प्रवासी कृष्णा (17 वर्ष ,मेनूर) व बिलोली तालुक्यातील महाजन भुजंग दुधारे (45 वर्ष ) व अन्य तीन अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कामारेड्डी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीनिवास रेड्डी, पोलीस उपाधीक्षक जयपाल रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली व दोन क्रेनच्या साहाय्याने ऑटोमधील मृतकांना बाहेर काढण्याची व्यवस्था केली. सदरील दुर्घटनेनंतर महामार्गाचा एक रस्ता 5 तासासाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही रस्ते मोकळे करण्यात आले. हा महामार्ग नवीन झाला असून बरेच अप्रशिक्षित ऑटो चालक बेसावध, भरधाव वेगाने व नियमांची पायमल्लीकरून ऑटो चालवत असल्याने अशा दुर्घटना वारंवार होत आहेत.

हेही वाचा -ह्रदयद्रावक : वाढदिवसादिवशीच काळाचा घाला; स्विमिंग पूलमध्ये पडून २ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Last Updated : Jul 19, 2022, 7:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details