नांदेड : उमरी-मुदखेडजवळ धावत्या टेम्पोच्या कॅबिनचे लॉक अचानक तुटल्याने त्यातून पडून एका तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. अपघातामध्ये टेम्पोचालक आणि दुचाकीस्वार असे दोघेजण बचावले आहेत. नाजोद्दीन ताजोद्दीन बाशुमिया (वय-34) असे मृताचे नाव आहे.
हेही वाचा -नोकरच निघाला चोर, जालन्यात चौघांना अटक
नाजोद्दीन ताजोद्दीन बाशुमिया हे आपल्या मालकीच्या टेम्पोच्या दुरुस्तीसाठी नांदेडला जात होते. प्रवासादरम्यान उमरी-मुदखेड जवळील हनुमान मंदिराच्या उतारावर टेम्पोच्या कॅबिनचे लॉक अचानक तुटले. उतार असल्याने कॅबिन समोर उलटली गेली. यावेळी कॅबिनची काच फुटल्याने त्यातील नाजोद्दीन ताजोद्दीन बाशुमिया हे बाहेर फेकले गेले. यानंतर काही कळण्याच्या आत रस्त्यावर पडलेल्या नाजोद्दीन ताजोद्दीन बाशुमिया यांच्यावर टेम्पो गेला.
दरम्यान, नांदेडहून उमरीकडे येणाऱ्या बालाजी शिंदे या तहसील कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर अनियंत्रित झालेला टेम्पो कोसळला. यावेळी प्रसंगावधान राखून शिंदे यांनी दुचाकी सोडून उडी मारल्यामुळे तेही या अपघातातून बचावले आहेत. मात्र, त्यांच्या दुचाकीचा चुराडा झाला.
हेही वाचा -बापरे..! कैद्यानेच बदडले पोलिसांना, जळगावातील घटना