नांदेड -विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) आज नांदेड दौऱ्यावर आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर ( Mahur in Nanded ) येथे अजित पवार यांनी पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे ( Former minister Dhananjay Munde ) देखील उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा अजित पवार यांनी यावेळी ऐकूण घेतल्या ( Ajit Pawar listened farmers Problem ). ज्या भागात पंचनामे झाले नाहीत तिथल्या पीडित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
अजित पवार यांची टीका -मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर सुद्धा अजित पवार यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा टिका केली ( Eknath Shinde criticized Ajit Pawar ) होती. त्यावर बोलताना मला माझा काम करू द्या तुम्ही तुमच काम करा आम्ही यात राजकारण करत नाही. कालच माहूरमध्ये शेतकऱ्याने आत्नहत्या ( Farmer committed suicide ) केली. त्यांच्या कुटूंबीयांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या वेदना अडचणी जाणून घेतल्या. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी असे सुद्धा अजित पवार म्हणाले.