नांदेड - जिल्ह्यात बुधवारच्या विश्रांतीनंतर गुरुवारी कोरोनाचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 296 इतकी झाली आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यात चार तर गुरुवारी सहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
नांदेडमध्ये गुरुवारी 10 पॉझिटिव्ह रुग्णांची भर; कोरोनाबाधितांची संख्या 300 च्या उंबरठ्यावर
आज (गुरुवार)रोजी 226 अहवाल तपासण्यात आले. यामध्ये 198 अहवाल निगेटिव्ह आले. तर, दहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये पाच पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. सोमेश कॉलनीमधील 75 वर्षीय पुरुष, परिमल नगर 33 वर्षीय, चैतन्य नगर 43, भगतसिंघरोड येथील 24 तर औरंगाबादवरून आलेल्या एका 33 वर्षीय पुरुषाचा यात समावेश आहे.

तर, महिलांमध्ये कामठा येथील दोन महिला, असून त्यांचे वय 19, 22 असे आहे. तर, गजानन कॉलनी तरोडा बु. येथील 42 वर्षीय महिला, मुखेड येथील विठ्ठल मंदिर येथील 55 वर्षीय महिला आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील 55 वर्षीय महिलेचा सुद्धा समावेश आहे. तर, दिवसभराच्या काळात एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.
कोरोनाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती गुरुवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची माहिती -
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 5441
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4948
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2825
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 299
• पैकी रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये - 130
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4818
• आज घेतलेले नमुने - 35
• एकूण नमुने तपासणी - 5514
• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 296
• पैकी निगेटिव्ह - 4841
• नमुने तपासणी अहवाल बाकी - 45
• नाकारण्यात आलेले नमुने - 91
• अनिर्णित अहवाल - 232
• कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 181
• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यूसंख्या - 13
• जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 145683 आहेत. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.