नांदेड - दिवसेंदिवस नांदेडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज (रविवार) आणखी 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ते एनआरआय यात्री निवासमध्ये होते. 6 पैकी एक ठाण्याचा, 2 पंजाबमधील आणि 3 उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळते आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51 झाली आहे. तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्ये आणखी 6 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 51वर
नांदेडमध्ये आज आणखी 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ते एनआरआय यात्री निवासमध्ये होते. 6 पैकी एक ठाण्याचा, 2 पंजाबमधील आणि 3 उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळते आहे.
आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत कोरोना संदर्भात प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाप्रमाणे आतापर्यंत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 96 हजार 147 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तर एकूण 1 हजार 690 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 571 स्वॅब तपासणीचाचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून 37 जणांचा अहवाल प्रलंबित आहे. घेतलेल्या एकूण स्वॅब पैकी 51 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह असलेल्या 51 रूग्णांपैकी 11 रुग्ण हे डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचार घेत आहेत. तर पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 32 रुग्णांवर आणि माहूर कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्ण हे मृत झाले आहेत. औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पावलेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.