नांदेड- नायगाव तालुक्यातील इकळीमाळ ते कुंटुर या मार्गावर अवैध रेती भरुन जाणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली आहे. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सूरज बोडके असे मृत तरुणाचे नाव आहे.
टिप्परच्या धडकेत तरुणाचा मृत्यू... हेही वाचा-एसटी चालकामळे मुलीचा पाय गमावला; कुटुंबियांची महामंडळाकडे पुर्नवसनाची मागणी
या घटनेनंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, घटनास्थळी नायगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी भेट दिली असून त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या रस्त्यावर वाहनांचा सुसाट वेग असतो. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.