महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तिघी जणी बेपत्ता - तीन महिला बेपत्ता

शहरातील पंढरपूरनगर, ज्ञानेश्वरनगर, देशमुखनगरी या भागातून तिघी जणी बेपत्ता झाल्या असून भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

भाग्यनगर पोलीस ठाणे

By

Published : Nov 24, 2019, 3:15 PM IST

नांदेड - शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंढरपूरनगर, ज्ञानेश्वरनगर, देशमुखनगरी या भागातून तिघी जणी बेपत्ता झाल्या असून पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. आशा पांडूरंग भालेराव (वय २८, राहणार पंढरपूरनगर), सुरेखा गोडबोले(वय २४, रा. ज्ञानेश्वरनगर) तर, तरोडा बु. येथील स्वाती पुंडलिक बिच्चेवार (वय २४) अशी बेपत्ता झालेल्या तिघींची नावे आहेत.

हेही वाचा - नांदेड : हिमायतनगर शहरात डेंग्यूचा दुसरा बळी

नांदेडच्या वाडी बु. भागातल्या पंढरपूरनगरातील रहिवासी पांडूरंग भालेराव यांची पत्नी आशा ही वेडसर असून तिला अंधूक अंधूक दिसते. २० नोव्हेंबरला रात्री १० वाजता ती अचानक राहत्या घरातून निघून गेली. त्यानंतर नातेवाईक व परिचितांकडे तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने पती पांडुरंग भालेराव यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची फिर्यादी दिली.

हेही वाचा -दीपकसिंह रावत यांचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा; नांदेडच्या महापौरांकडे सोपविले पत्र
याच भागातील ज्ञानेश्वरनगरमधीर रहिवासी प्रदीप गोडबोले यांची पत्नी सुरेखा ही २१ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे धुणे भांडीच्या कामासाठी घरातून निघाली. मात्र, त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यानंतर सुरेखाचे पती प्रदीप यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलिसांनी ती हरवल्याची नोंद केली. पोलीस हेड काँस्टेबल एमडी शिरसाट या घटनेचा पुढील तपास करत आहेत. तर, देशमुखनगरी तरोडा बु. येथील रहिवासी स्वाती पुंडलिक बिच्चेवार ही तरुणीही कुणाला काहीही न सांगता काकाच्या घरातून निघून गेली आहे. याबाबत मन्मथ बिच्चेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवर भाग्यनगर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा -स्वाराती विद्यापीठाचा महाविद्यालयाने आदर्श घ्यावा - जिल्हाधिकारी अरुण डोंगरेमहापौरांकडे सोपविले पत्र

ABOUT THE AUTHOR

...view details