नांदेड -शहरात आणि परिसरात एकाच रात्री चोरट्यांनी 3 दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. या चोरीच्या घटनेत 21 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. चोरीच्या घटनेमुळे कलामंदिर भागातील व्यापारी धास्तावले आहेत.
हेही वाचा -नांदेड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप
शहरातील कलामंदिर समोरील डॉक्टर गल्लीमध्ये 8 जानेवारीला राज मेडिकल, कैलास एजन्सी आणि श्री दत्तकृपा एजन्सी ही तीन दुकाने चोरट्यांनी फोडून लुटली आहेत. या सर्व दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतानाही चोरट्यांनी या ठिकाणी धाडसी चोरी केली आहे. दुकानांमधील सीसीटीव्ही यंत्रणा तोडून ही तीनही दुकाने चोरट्यांनी फोडली. या घटनेत एकूण 21 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे.
हेही वाचा -नांदेडमध्ये देशव्यापी संपाला उस्फूर्त प्रतिसाद, शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट
दरम्यान, याप्रकरणी कामाजी तिडके (रा. बोंढार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात कलम 457, 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक आगलावे करीत आहेत.