नांदेड -चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटल्याची घटना नांदेड शहरातील पूर्णा रोडवर घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
पूर्णा रोडवरील पावडे मंगल कार्यालयाच्या मागील रस्त्यावर गजेंद्र शेंडे (१७, रा. आशिषनगर, पूर्णा रोड नांदेड) हा १० नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता मित्रासह जेवण करून घरी जाण्यासाठी थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्या ताब्यातील दहा हजारांचा मोबाईल आणि पाच हजार रुपये घेऊन पळ काढला.