नांदेड- अर्धापूर शहरात नववर्षाच्या पूर्वसंधेला गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन गटात किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत तिघे जण जखमी झाले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील बारा जणांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमींवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.
गुन्हे दाखल आरोपींची नावे-
या प्रकरणात सय्यद आलीम सय्यद इर्शाद, नदीम अब्दुल करिम, मुस्तफा खान आमीर खान, वसीम मुल्ला, सय्यद अनिस सय्यद इर्शाद, संदेश प्रभाकर कंधारे, लक्ष्मण रमेश डोंगरे, राहूल संजय भालेराव यांच्यासह अन्य बारा जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
लाठ्या-काठ्यांचा वापर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नव वर्षाच्या पूर्व संधेला अर्धापुरातील नवी अबादी परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. त्याचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटाच्या आरोपींनी लाठ्या काठ्यांचा साह्याने एकमेकांवर हल्ले केले. त्यामध्ये तिघेजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले होते. असे असतानाही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन काही तरुणांनी गोंधळ घालत मारहाण केली. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे यांनी तक्रार दाखल करून घेत या दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.