नांदेड- शहरातील सिडको रस्त्यावर असलेल्या गोदामातून जवळपास तीनशे पोते तांदूळ चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेल्या या तांदळाची किंमत ५ लाख ५० हजार १२५ रुपये आहे.
नांदेड: ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून साडेपाच लाखांची तांदूळ चोरी - robbery in nanded
राजेश लक्ष्मीनारायण भराडीया यांच्या मालकीच्या गाळ्यांमधून जवळपास तीनशे पोते तांदळाची चोरी झाली असून याची किंंमत 5 लाख 50 हजार 125 रूपये इतकी आहे.
नांदेडात तांदळाची चोरी
राजेश लक्ष्मीनारायण भराडीया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नवा मोंढा सिडको येथे कर्करोग रूग्णालयासमोर त्यांचे दोन गाळे (क्रमांक ११९व१२०) आहेत. मध्यरात्री दोन गाळ्यांमध्ये असलेले तांदळाचे ३०१ कट्टे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख जावेद अधिक तपास करत आहेत.