महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी  137 कोरोनाबाधित, तिघांचा मृत्यू

मंगळवार 4 ऑगस्ट 2020 ला इस्लामपूर नांदेड येथील वय 45 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर विद्युतनगर येथील वय 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 97 एवढी झाली आहे.

three corona positive patient died in nanded
three corona positive patient died in nanded

By

Published : Aug 5, 2020, 10:31 AM IST

नांदेड- जिल्ह्यात आज 4 ऑगस्टला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 37 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 137 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 729 अहवालापैकी 573 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 2 हजार 496 एवढी झाली असून यातील 1 हजार 57 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 329 बाधितांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 37 महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे.

सोमवार, दि. 3 ऑगस्टललाऑगस्टला सिडको नांदेड येथील 56 वर्षाचा पुरुष खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना, मंगळवार 4 ऑगस्ट 2020 ला इस्लामपूर नांदेड येथील वय 45 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर विद्युतनगर येथील वय 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 97 एवढी झाली आहे.

आज बरे झालेल्या 37 कोरोनाबाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड येथील 1, बिलोली कोविड केअर सेटर 11, मुंबई येथील संदर्भित 1 , मुखेड कोविड केअर सेंटर येथील 7, नायगाव कोविड केअर सेंटर येथील 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील 6, हैद्राबाद येथील संदर्भित 1, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 5, अशा एकूण 37 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये लोह तालुक्यात 03, भोकर तालुक्यात 03, देगलूर तालुक्यात 11, हदगाव तालुक्यात 12, कंधार तालुक्यात 01, नांदेड ग्रामणी 01, किनवट तालुक्यात 01, मुखेड तालुक्यात 09, नायगाव तालुक्यात येथे 08, उमरी तालुक्यात 03, नांदेड शहरी 18, उजैन मध्यप्रदेश 01, तोफखाना मस्जिद परिसर हिंगोली 01 याप्रमाणे 72 बाधित तर अँटिजेन तपासणीद्वारे हिमायतनगर 18, लोहा 05, देगलूर 21, बिलोली 06, मुखेड 01, नांदेड शहर 14 असे याप्रमाणे अँटिजेन तपासणीद्वारे 65 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 329 बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 126, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 472, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 41, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 70, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 33, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 107, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 102, लोहा कोविड केअर सेंटर येथे 7, हदगाव कोविड केअर सेंटर 90, भोकर कोविड केअर सेंटर 04, उमरी कोविड केअर सेंटर 14, कंधार कोविड केअर सेंटर येथे 15, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 29, किनवट कोविड केअर सेंटर येथे 23, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 11, मुदखेड कोविड केअर सेटर 10, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20, खाजगी रुग्णालयात 147 औरंगाबाद येथे संदर्भित 05, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 1 तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.


जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 518,
घेतलेले स्वॅब- 17 हजार 758,
निगेटिव्ह स्वॅब- 13 हजार 537,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 137,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 2 हजार 496,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 12,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 07,
मृत्यू संख्या- 97,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 97,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 329,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 574.

ABOUT THE AUTHOR

...view details