महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तू माझं काम कसं करत नाही तेच बघतो..! नगरसेवकाची मुख्याधिकाऱ्याला धमकी - ardhapur police station

नगरसेवकाने मोठमोठ्या आवाजाने कक्षातील टेबलवर हात आदळून मोठ्या आवाजामध्ये बोलून 'तू कसे काम करीत नाहीस ते मी बघून घेतो?' अशी धमकी दिली. तेव्हा त्यांना कायदेशीर मार्गाने मागणी करा, असे मुख्याधिकारी म्हणत होते.

ardhapur police station, nanded
अर्धापूर पोलीस ठाणे

By

Published : Jan 20, 2020, 9:12 PM IST

नांदेड - अर्धापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांना नगरसेवक मुख्तदीरखान पठाण यांनी 'तू माझे काम कसे करत नाहीस तुला बघून घेतो', यासह अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच नगरपंचायत कार्यालय, भररस्त्यात अडवून आणि पोलीस ठाण्यातही धमकी देत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नगरसेवक मुख्तदिरखान विरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० जानेवारीला दुपारी एक ते दीडच्या सुमारास अर्धापूर नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी गिरीश दापकेकर कक्षामध्ये हजर होते. नगरसेवक मुख्तदिरखान पठाण यांनी माझ्या वार्डातील पुलाचे काम का केले नाही ? अशी मुख्याधिकारी यांना विचारणा केली. त्यावर त्यांना नगर अभियंता आजच रुजू झालेले आहेत. त्यांना संबंधीत कामाचे अंदाजपत्रक तयार करुन काम करण्यास सांगतो, असे मुख्याधिकारी दापकेकर यांनी सांगितले. नगरसेवकाने मोठमोठ्या आवाजाने कक्षातील टेबलवर हात आदळून मोठ्या आवाजामध्ये बोलून 'तू कसे काम करीत नाहीस ते मी बघून घेतो?' अशी धमकी दिली. तेव्हा त्यांना कायदेशीर मार्गाने मागणी करा, असे मुख्याधिकारी म्हणत होते. मात्र, नगरसेवकाने मोठ्या आवाजात एकेरी भाषेत बोलून मुख्याधिकारी यांच्यासोबत वाद घातला. कक्षाबाहेर आल्यानंतरही कार्यालयातील कर्मचाऱ्यासमक्ष अपमानास्पद शिवीगाळ केली. कार्यालयातील कर्मचारी यांनाही दैनंदिन कामकाज करु दिले नाही आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

हेही वाचा -'आर्थिक विषयांवर केंद्र सरकारचं वागण एखाद्या दारुड्यासारखं'

यानंतर नमूद प्रकरणी मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांसह अर्धापूर पोलीस स्टेशन तक्रार देण्यासाठी येत असताना त्यांनी पुन्हा भररस्त्यात अडवून धमकी दिली. यावरही न थांबता पोलीस ठाण्यातही येऊन पोलिसांसमक्ष अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

याप्रकरणी, मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक मुख्तदिरखान सिकंदर खान पठाण यांच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ सुरवसे हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details