नांदेड - आयसीस आणि इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या नावाचा उल्लेख करत भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना धमकी देणाऱ्या नांदेडच्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सय्यद अब्दुल रहेमान, असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. भोपाळ दहशतवाद विरोधी पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने आरोपी डॉक्टरला देगलूर नाका भागातून ताब्यात घेतले.
आरोपी डॉ. सय्यद अब्दुल रहेमान याने खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना एक संशयित लिफाफा पाठवला. त्यात आपल्या आई, वडील आणि भावाचे आयसीस आणि इंडियन मुजाहीद्दीन या संघटनेशी संबंध असल्याचा उल्लेख करत धमकी दिली होती. याबाबत खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळ दहशतवाद विरोधी पथकाकडे तक्रार केली. भोपळ एटीएसने चौकशी करून आरोपी डॉक्टर नांदेडचा असल्याचे निष्पन्न केले.