महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडकराना दिलासा; पाणीपट्टी कर 'जैसे थे' - पाणीपट्टी

सध्याच्या परिस्थितीत महापालिकेने पाणीपट्टी करात वाढ न करता जो पूर्वीचा कर आहे. त्यानुसारच पाणीपट्टी वसूल करावी, अशा सूचना महापौर दीक्षा धबाले यांनी केल्या.

नांदेड महानगरपालिका

By

Published : Nov 18, 2019, 12:29 PM IST

नांदेड- सध्याच्या परिस्थितीत महापालिकेने पाणीपट्टी करात वाढ न करता जो पूर्वीचा कर आहे. त्यानुसारच पाणीपट्टी वसूल करावी, अशा सूचना महापौर दीक्षा धबाले व उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी बैठकीत प्रशासनाला केल्या आहेत. सध्या तरी नांदेडकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

महापालिकेत महापौर धबाले यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा आणि पाणीपट्टीसंदर्भात चर्चा करण्यात आली. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीसाठादेखील कमी होता. त्यामुळे उन्हाळ्यात चार ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यामुळे पाणीपट्टीत आता वाढ करू नये, अशा सूचना महापौर व उपमहापौर यांनी केल्या. त्याचबरोबर यंदा पाऊस चांगला झाला असून पाणीसाठाही चांगला झाला आहे. त्यामुळे आतापासूनच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे आणि नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशा सूचनाही या वेळी सदस्यांनी केल्या.

उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी महापालिका शासनाने जी पूर्वीची पाणीपट्टी आहे तीच ठेवावी त्यात दहा टक्के वाढ करू नये, अशी सूचना उपमहापौर देशमुख यांनी केली. यावेळी महापौरांनी निवासस्थानाचा प्रश्न उपस्थित करून ते उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी आयुक्त लहुराज माळी, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपायुक्त विलास भोसीकर यांच्यासह अधिकारी, सदस्य उपस्थित होते.

54 हजार नळधारकांना दिलासा
दरम्यान 54हजार नळजोडणी सध्या महापालिकेतर्फे शहरात 6 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आहेत. पाणीपट्टीचा वार्षिक दर जवळपास अडीच हजारांच्या घरात आहे. गेल्या वर्षी जवळपास १७ कोटी रुपये पाणीपट्टीची करवसुली होती. दरवर्षी दहा टक्के दरवाढ होत असते. मात्र, यंदा पाणीपट्टीच्या करात वाढ होणार नसल्याचे चित्र असून त्यामुळे या नळधारकांना दिलासा मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details