नांदेड -'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' याचा अर्थ देणाऱ्यांचे दातृत्व घेणाऱ्या हातांकडे आले पाहिजे. घेणाऱ्या हातांनी कधीतरी देणारेही झाले पाहिजे. याचा प्रत्यय नांदेडमध्ये पहायला मिळाला आहे. तृतीयपंथी म्हटले की कायम घेणारे हात, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, जागतिक महामारीच्या या संकटात तृतीयपंथीयांनी आपले सामाजिक भान जपत, दातृत्वाची जाणीव ठेऊन लॉकडाऊनमुळे घरादारापासून परागंदा झालेल्या नागरिकांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे.
मागणारे हातही जेव्हा देणारे होतात... नांदेडमध्ये गरजूंना जेवण देण्यासाठी तृतीयपंथीय सरसावले - लॉकडाऊन इफेक्ट
घेणाऱ्या हातांनी कधीतरी देणारेही झाले पाहिजे, याचा प्रत्यय नांदेडमध्ये पाहायला मिळाला आहे. तृतीयपंथी म्हटले की कायम घेणारे हात, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, जागतिक महामारीच्या या संकटात तृतीयपंथीयांनी आपले सामाजिक भान जपत, दातृत्वाची जाणीव ठेऊन लॉकडाऊनमुळे घरादारापासून परागंदा झालेल्या नागरिकांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था केली आहे.
हेही वाचा...LOCK-DOWN : दोन दिवस उपाशी राहिल्यावर एकवेळचे जेवण मिळतंय..मुंबईतील बेघरांची करुण कहाणी
नांदेडमध्ये सांगवी भागात कमल फाउंडेशनच्या वतीने तृतीयपंथीयांनी एकत्र येत एक अन्नछत्र सुरू केले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, ज्यांचे हातावर पोट आहे, अशा नागरिकांचे या दिवसात मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही, अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. अशा गरजूंना तृतीयपंथीयांकडून मोफत जेवण देण्यात येत आहे.