नांदेड- हडको येथील आपल्या मैत्रिणीला घेवून नांदेड शहरात येत असलेल्या दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याजवळील 40 हजार रुपयांची सोन्याची पोत आणि सोन्याची अंगठी काढून घेण्यात आली. ही घटना हस्सापूर ते मामा चौक रस्त्यावर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
हडको एन.डी. 31 मधील विनोद कल्याणकराव होळकर रात्री 9 च्या सुमारास आपल्या दुचाकीवर मैत्रिणीला घेऊन निघाला होता. हस्सापर ते मामा चौक रस्त्याने जात असताना पुलाजवळ एका दुचाकीवर थांबलेल्या दोघांनी त्यांना अडविले. तलवारीने त्यांच्यावर हल्ला करत मैत्रिणीच्या गळ्यातील 40 हजार रुपयांची पोत आणि सहा ग्रॅमची अंगठी काढून घेतली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.