महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये एटीएम फोडून चोरट्यांनी पळवले २६ लाख

नांदेडमध्ये मालेगाव रस्त्यावरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २६ लाख ३० हजार रुपये चोरल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या एटीएम मधून २६ लाख ३० हजार रुपये चोरल्याचे समोर आले आहे.

thieves-stole-atm-in-nanded
नांदेडमध्ये एटीएम फोडून चोरी

By

Published : Dec 16, 2019, 6:53 PM IST

नांदेड -मालेगाव रस्त्यावरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरटयांनी २६ लाख ३० हजार रुपये चोरल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. नांदेड शहर आणि जिल्ह्यात मटका जुगार चालवणाऱ्यासह चोरांची पण चांदीच असल्याचा प्रकार यानिमित्ताने पुढे आला.

वजिराबाद पोलीस ठाणे नांदेड

हेही वाचा -नांदेड : पत्नीला परत घेऊन जाण्यास विरोध केल्याने जावयाने फोडले सासूचे डोके

भावसार चौक येथे एसबीआय बँकेचे एटीएम आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास बँकेचे कर्मचारी या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेले असतांना एटीएमचे शटर बंद होते. त्याला कुलूप नव्हते. पण, शटर खाली केलेले होते. कर्मचाऱ्यांनी शटर वर केले तेव्हा आतील एटीएम मशीन फोडलेले आढळले. चोरट्यांनी एटीएमच्या आत शिरून पद्धतशीरपणे चोरीचा मोठा बेत यशस्वी केला.हा एटीएम फोडण्याचा प्रकार १४ डिसेंबरच्या रात्री पासून १५ डिसेंबरच्या पहाट होण्या अगोदर घडला असेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -लोहामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 13 जणांना अटक

एकाच एटीएममध्ये दुसऱ्यांदा चोरी -

हेच एटीएम काही दिवसांपूर्वी फोडले होते. त्याचे चोरटे बुलढाणा पोलिसांनी पकडले होते. पुन्हा एकदा तेच एटीएम फोडून चोरटयांनी २६ लाख ३० हजार रुपये चोरून नेले आहेत. चोरी केल्यानंतर एटीएमचे शटर खाली करून चोरटे गुपचूप निघून गेले आहेत. शटर खाली असल्याने ही घटना कोण्याच्याही लक्षात आली नाही. बँकेचे कर्मचारी एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी गेले आणि चोरीचा प्रकार समोर आला. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details