नांदेड - अज्ञात चोरट्यानी नांदेड-हैद्राबाद मुख्य रस्त्यावर असलेल्या राजेश व्यंकटराव बंदमवार यांच्या दुकानाचे शटर तोडून ५० ते ६० हजार रुपयांचा गल्ला साफ केला. सदर घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घुंगराळा येथील रहिवासी राजेश व्यंकटराव बंदमवार (४५) यांचे एक किराणा दुकानासह आडत दुकान आहे. दिनांक १ जुलै २०१९ रोजी दिवसभर आवक जावकचा व्यवसाय करून ते घरी गेले. दिनांक २ जुलै २०१९ रोजी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी अज्ञात चोरट्यांनी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावरील किराणा दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. गल्यातील ५० ते ६० हजार रुपायांची रक्कम घेऊन ते नायगावकडे पसार झाले. याप्रकरणाच्या तपासणीकरिता घुंगराळ्यात श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.