महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 'लॉकडाऊन' नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

नांदेड जिल्ह्यात केवळ जमावबंदीचे आदेश लागू असून टाळेबंदी करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करत टाळेबंदीच्या अफवा पसरविऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

By

Published : Feb 20, 2021, 7:49 PM IST

नांदेड- जिल्ह्यात केवळ जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात टाळेबंदी करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे आहे. व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवर, ट्विटर व इतर कोणत्याही सोशल मीडियावर जर कोणी चुकीचे व अफवा पसरवणारे संदेश पाठवले तर त्यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाला कठोर पाऊले उचलायची वेळ आणू नये

कोरोना बाधितांची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती खबरदारी घेत आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत: अटोक्यात असून यात नागरिकांची भूमिका खूप महत्वाची आहे. यामुळे नागरिकांनाी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे व सॅनिटायझरचा वापर करावा. याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. नागरिकांनी जर संयमी जबाबदारी पार पाडली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पाउले उचलायची वेळ येणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -...हे पंतप्रधान मोदींच्याच कार्यकाळात घडणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीवर अशोक चव्हाणांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details