नांदेड- शहरातील हनुमान टेकडी भागात असलेल्या दुकानाची खिडकी तोडून अज्ञात चोरटयांनी दुकानात प्रवेश करुन रोख रक्कम व इतर वस्तू असा १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.वजिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लॉकडाऊनचा फायदा घेत चोरट्यांकडून रोख रक्कमेसह १ लाख ६१ हजाराचा ऐवज लंपास - Vajirabad police
लॉकडाऊनचा फायदा उठवत नांदेड शहरातील दुकानाची खिडकी तोडून चोरांनी रोख रक्कम व इतर वस्तू असा एकूण १ लाख ६१ हजारांचा ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
वजिराबाद भागातील व्यापारी इम्रान इकबाल इरानी यांचे हनुमान टेकडी परिसरात रोडवर दुकान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे हे दुकान बंद होते. ही संधी साधून अज्ञात चोरटयांनी दुकानाची खिडकी तोडून दुकान प्रवेश करत रोख रक्कम व सामान असा १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.
इम्रान इरानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिसांनी अज्ञात चोरटयांविरद्ध गुन्हा नोंदविला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मरे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.