महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडच्या नवा मोंढा भागातील कृषी सेवा केंद्रातील शटर वाकवून अडीच लाख लंपास - वसुंधरा सीड्स अँड अॅग्रो केमिकल्स

नवा मोंढा भागातील वसुंधरा फर्टिलायझर्समध्ये चोरट्यांनी शटर तोडून गल्ल्यामधील रोख अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कृषी सेवा केंद्रातील शटर वाकवून अडीच लाख लंपास

By

Published : Jul 6, 2019, 2:45 PM IST

Updated : Jul 6, 2019, 3:06 PM IST

नांदेड - शहरातील नवा मोंढा भागातील वसुंधरा फर्टिलायझर्समध्ये चोरट्यांनी शटर तोडून गल्ल्यामधील रोख अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली. ही घटना ५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नांदेडमध्ये चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
नांदेड शहरातील नवा मोंढा परीसरातील दिनेश अग्रवाल व संजय अग्रवाल यांच्या वसुंधरा सीड्स अँड अॅग्रो केमिकल्स या दुकानाचे शटर वाकवून चोर आत शिरले. यावेळी गल्ल्यामधील १ लाख ८० हजार तसेच वसुंधरा फर्टिलायझर्समधील ७० हजार असे एकूण दोन्ही दुकानातून नगदी २ लाख ५० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केला. सदरील चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Last Updated : Jul 6, 2019, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details