नांदेड - स्वातंत्र्यदिन हा सर्व भारतीयांसाठी राष्ट्रीय सण मानला जातो. प्रत्येक भारतीय नागरिक या दिवशी राष्ट्रध्वजाला आदरपूर्वक सॅल्यूट करतो. अत्यंत दिमाखात डोलणारा राष्ट्रध्वज नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीत तयार होतो. ( Where is the national flag made? ) राष्ट्रध्वजाची तयार करणाऱ्या कामगारांना मात्र गेल्या २५ वर्षांपासून किमान वेतनही मिळत नाही.
वर्षाला राष्ट्रध्वज विक्रीची उलाढाल ६० लाखांहून अधिक - देशात कर्नाटकातील हुबळी, राज्यातील नांदेड आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. निर्मिती समितीत जवळपास ५०० कामगार काम करतात. त्यापैकी बहुसंख्य महिलाच आहेत. तथापि प्रत्यक्ष राष्ट्रध्वज निर्मितीमध्ये जवळपास १५० कामगार आहेत. राष्ट्रध्वजाचे कापड, शिलाई, गुंडी, अशोक चक्र हे सर्व येथेच केले जाते. वर्षाला राष्ट्रध्वज विक्रीची उलाढाल ६० लाखांहून अधिक आहे.
इतर राज्यांतही हाच राष्ट्रध्वज -राज्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब राज्यातही खादी ग्रामोद्योगमध्ये राष्ट्रध्वज पाठवले जातात. राष्ट्रध्वज हा अभिमानाचा विषय असला तरी त्याची निर्मिती करणाऱ्या कामगारांना मात्र किमान वेतनही मिळत नाही. खादी ग्रामोद्योग समितीत रोजंदारीवर काम दिले जात नाही. कामाप्रमाणे पैसे दिले जातात. या हिशेबाने प्रत्येक कामगारांना केवळ १०० रुपये मजुरी मिळते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजुरीपेक्षाही हे वेतन कमी आहे.