नांदेड -नऊ वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेल्या नांदेड येथील दोघांची पुराव्याअभावी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष म्हणून मुक्तता केली आहे. नांदेड येथील मोहम्मद इलियास व मोहम्मद इरफान यांना 1 ऑगस्ट, 2012 रोजी अटक करण्यात आली होती. नऊ वर्षांनंतर न्याय मिळाल्याने मै बेगुनाह था और कोर्टमे वही साबित हुआ, असे म्हणत त्यांनी 'ईटीव्ही भारत'समोर आनंद व्यक्त केला.
काय आहे प्रकरण..?
मोहम्मद इलियास आणि मोहम्मद इरफान यांना महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) ऑगस्ट, 2012 मध्ये नांदेड येथून अटक केले होते. राजकीय नेता, पोलीस अधिकारी व पत्रकाराला मारण्याच्या षड;यंत्रातील ते एक भाग होते, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणातील तिघांना 10 वर्ष शिक्षा
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यत इलियास व इरफानसह एकूण पाच जणांना 2013 मध्ये देण्यात आले होते. दि. 12 जून, 2021 रोजी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोहम्मद अक्रम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सादिक या तिघांना युएपीए आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. तर इलियास व इरफान या दोघांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
नऊ वर्षानंतर निर्दोषत्त्व सिद्ध
इलियासचा नांदेड येथे फळ विक्रीचा व्यवसाय होता. तर इरफानचा इनव्हर्टर बॅटरीचा व्यवसाय होते. सुटकेनंतर इरफान म्हणाला की, मी निष्पाप आहे, असे मी अगोदरच म्हणत होतो. पण, आमचे कोणीच ऐकले नाही. संथपणे चालणाऱ्या न्याय यंत्रणेमुळे नऊ वर्षानंतर का होईना दिलासा मिळाला आहे.
अटक झाली तेव्हा मला अक्षरशः धक्काच बसला