नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 60 अहवालापैकी 292 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 231 तर अँटिजेन तपासणीद्वारे 61 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 86 हजार 235 एवढी झाली असून यातील 79 हजार 950 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 163 रुग्ण उपचार घेत असून 170 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाने 1772 मृत्यू....!
दिनांक 11, 12 व 13 मे 2021 या तीन दिवसांच्या कालावधीत 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 772 एवढी झाली आहे.
4 हजार 163 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु...!
आज 4 हजार 163 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 67, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 88, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 28, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 69, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 49, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 14, बिलोली कोविड केअर सेंटर 90, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 9, नायगाव कोविड केअर सेंटर 8, उमरी कोविड केअर सेंटर 15, माहूर कोविड केअर सेंटर 12, भोकर कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 27, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 26, कंधार कोविड केअर सेंटर 5, धर्माबाद कोविड केअर सेंटर 27, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 25, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 13, एनआरआय कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 252, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 419, खाजगी रुग्णालय 753 व्यक्ती उपचार घेत आहेत.