महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडचा पारा 45 अंशावर; मराठवाड्यातील सर्वाधिक तापमानाची झाली नोंद - Nanded temperature

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी नांदेडचे तापमान आजच्या तारखेत सर्वाधिक असल्याचे निर्दशनास आले. सोमवारी जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर पोहचला. मराठवाड्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद नांदेडमध्ये झाली.

Temperature
तापमान

By

Published : May 5, 2020, 7:41 AM IST

नांदेड - सोमवारी जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर पोहचला. मराठवाड्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद नांदेडमध्ये झाली. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने बहुतांशी नागरीक घरातच आहेत त्यामुळे अनेकांना तापमानाचे चटके जाणवले नाहीत.

गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी नांदेडचे तापमान आजच्या तारखेत सर्वाधिक असल्याचे निर्दशनास आले. येत्या काही दिवसात नांदेडचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details