नांदेड - शहारतील पीरबुऱ्हाणनगर येथे आढळून आलेल्या ६४ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. त्यास मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यासारखे गंभीर आजार असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
'त्या' कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती गंभीर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू - corona update nanded
पीरबुऱ्हाणनगर येथे आढळून आलेल्या ६४ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती गंभीर असून त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यासारखे आजार आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. सध्या त्याच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नांदेडच्या पीरबुऱ्हाणनगर येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व नागरिकांचा तपासणीनंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, खबरदारी म्हणून पीरबुऱ्हाणनगर व बाजूचा ५ किलोमीटरचा परिसर प्रशासनाने सील केला आहे. हा रुग्ण २० एप्रिलला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर रुग्णाला कोरोनाचा संसर्ग कुठून झाला असावा याचा शोध अजूनपर्यंत लागला नसून याचा शोध प्रशासन घेत आहे.
सदर रुग्णाची प्रकृती सध्या गंभीर असून त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यासारखे आजार आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. सध्या त्याच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.