नांदेड - सध्या उष्णतेची मोठ्या प्रमाणात लाट आली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी काहीही करून उन्हाची काहिली शमविण्याचा प्रयत्न नागरिक करताना दिसून येत आहेत. एप्रिल महिन्यातील सर्वात जास्त तापमान शुक्रवारी नांदेड जिल्ह्यात ४४.५ अंश सेल्सिअस इतके तापमान मोजले गेले. तर आर्द्रता १७ टक्के इतकी होती.
नांदेडमध्ये उन्हाचा कहर; तापमान ४४ अंशावर - temprature
एप्रिल महिन्यातील सर्वात जास्त तापमान शुक्रवारी नांदेड जिल्ह्यात ४४.५ अंश सेल्सिअस इतके तापमान मोजले गेले. तर आर्द्रता १७ टक्के इतकी होती.

नांदेडमध्ये उन्हाची काहिली वाढत आहे
नांदेडमध्ये उन्हाची काहिली वाढत आहे
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले असून, दुपारनंतर सर्व रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक नागरिकांना उन्हाचा चटका बसल्यामुळे उष्मघाताचे अनेक रुग्ण दिसून येत आहेत. उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.