महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Accident News : आडेली देवीचा नवस फेडण्यासाठी जाणारा पिकअप उलटला; भीषण अपघातात 19 अतिगंभीर - ग्रामीण रुग्णालय

Terrible Accident: किनवट तालुक्यातील शिवनी येथील इसार पेट्रोल पंपाजवळ हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील एकाच कुटुंबातील 25 ते 30 नागरिक तेलंगणा राज्यातील आडेली माता देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना शिवनी परिसरात अचानक त्यांच्या गाडीसमोर एक शेळी आल्याने त्यांचा भीषण अपघात Terrible Accident झाला आहे.

Terrible Accident
Terrible Accident

By

Published : Oct 2, 2022, 3:12 PM IST

Updated : Oct 2, 2022, 4:18 PM IST

नांदेड: किनवट तालुक्यातील शिवनी येथील इसार पेट्रोल पंपाजवळ हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील एकाच कुटुंबातील 25 ते 30 नागरिक तेलंगणा राज्यातील आडेली माता देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना शिवनी परिसरात अचानक त्यांच्या गाडीसमोर एक शेळी आल्याने त्यांचा भीषण अपघात Terrible Accident झाला आहे. त्यात पिकअप टेम्पो नंबर MH26 H 3548 हा पलटी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील बारा ते तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 19 जणास नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले patients shifted nanded treatment असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. इतर नागरिकांवर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात Rural Hospital पुढील उपचार सुरू आहे.

नवस फेडण्यासाठी जाणारा पिकअप टेम्पो उलटून भीषण अपघात

नांदेड येथील रुग्णालय हलविण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील एकाच कुटुंबातील नागरिक तेलंगणा राज्यातील आडेली माता देवीचा नवस फेडण्यासाठी गावातील काही लोकांना सोबत घेऊन शिवनी मार्गे जात असताना त्यांच्या पिकप टेम्पो नंबर MH 26 H 3548 समोर अचानक एक शेळी आल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. त्यात 28 जण जखमी झाले आहेत, तर 19 जण नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे हिमायतनगर येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.

जखमींचे नावे त्यात कोंडाबाई रामराव जाधव, भाग्यश्री प्रभाकर जाधव, अंकिता साहेबराव जाधव, लोभाजी रामराव जाधव, आशा लोभाजी जाधव, साहेबराव रामराव जाधव, चतुराबाई किशन उपरे, मंजुषा प्रभाकर सोळंके, संदीप सुभाषराव जाधव, धनंजय विठ्ठलराव जाधव, खंडेराव बालाजी सोळंके, भागवत भगवान सोळंके, प्रभाकर दत्ताराव सोळंके, शंकर नारायण सरोदे, कौशल्य शंकर सरोदे, प्रभाकर रामराव जाधव, गोदावरी देवानंद सोळंके, सुमन सुभाष जाधव, रितेश प्रमोद वानखेडे, कौशल्या प्रमोद वानखेडे, सुभाष रामराव जाधव ,अंजली लोभाजी जाधव, रेखा सुभाष जाधव, गोदावरी शिवराम जाधव, परमेश्वर सुभाष जाधव, गायत्री संदीप जाधव, गणेश वानखेडे सह प्रमोद वानखेडे असे 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या टीमने शहरातील काही खाजगी डॉक्टरांच्या मदतीने उपचार करून 19 गंभीर जखमींना हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मदतीने तात्काळ 5 रुग्णवाहिकेची व्यवस्था करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले आहे.

Last Updated : Oct 2, 2022, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details