महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स - नांदेड कोरोना रुग्णसंख्या

कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत, त्यांना संरक्षण मिळावे तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत, याची दक्षता शासनातर्फे घेतली जात आहे. नांदेड जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

Task Force for the Care and Protection
Task Force for the Care and Protection

By

Published : May 14, 2021, 5:27 PM IST

नांदेड - कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत, त्यांना संरक्षण मिळावे तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत, याची दक्षता शासनातर्फे घेतली जात आहे. याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या दि. 7 मे 2021 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये नांदेड जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक -

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज या टास्क फोर्सबाबत बैठक संपन्न होऊन विचाराविमर्ष करण्यात आला. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिकारी प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शिवशक्ती पवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी तथा या समितीचे सदस्य उपस्थित होते.

वस्तुस्थितीसाठी जाणून घेऊन अहवाल देण्याच्या सूचना -

नांदेड जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे नेमकी अनाथ झालेली मुले आहेत का याची वस्तुस्थिती व सत्यता पडताळून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. ही वस्तुस्थिती नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपाचे आरोग्य अधिकारी व मनपा उपायुक्त, ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी व तहसिलदार हे अनाथ बालके असल्यास त्यांची सत्यता पडताळून टास्क फोर्सला माहिती सादर करतील.

अनाथ बालकांसाठी 1098 हेल्पलाइन नंबर -

शुन्य ते 6 वयोगटातील मुलांसाठी लोहा येथील शिशुगृह, वय वर्षे 6 ते 18 गटातील मुलींसाठी सुमन बालगृह नांदेड आणि लहुजी साळवे बालगृह वाडीपाटी येथे मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी 1098, सेव द चिल्ड्रेन्स 7400015518, 8308992222, अध्यक्ष बालकल्याण समिती 9890103972 आणि बालसंरक्षण अधिकारी- 9730336418 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details