नांदेड - जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तामसा गावाच्या निवडणूकीत रंगत आली आहे. नगरपंचायत दर्जाइतकी मोठी ग्रामपंचायत असलेल्या तामसा गावावर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे सेनेचे बंडखोर नेते बाबुराव कदम यांच्या विरोधात आजी-माजी आमदार रिंगणात उतरले आहेत. तामसा येथील निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ
निजामकाळापासून नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून तामसा गावाची ओळख आहे. मात्र हदगाव तालुक्यातील तामसा या गावाचा अद्याप काहीही विकास झालेला नाही. या गावाच्या विकासासाठी तामसा गावाला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी आहे.
तामसा ग्रामपंचायत निवडणूक : आजी-माजी आमदार समर्थकांच्या पॅनलला शिवसेनेच्या बंडखोर समर्थकांची टक्कर - Tamsa gram panchayat news
तामसा ग्रामपंचायत निवडणूक : आजी-माजी आमदार समर्थकांच्या पॅनलला शिवसेनेच्या बंडखोर समर्थकांची टक्कर

तामसा ग्रामपंचायत निवडणूक : आजी-माजी आमदार समर्थकांच्या पॅनलला शिवसेनेच्या बंडखोर समर्थकांची टक्कर
तामसा ग्रामपंचायत निवडणूक
सभा, प्रचारासाठी रोखपणे मजुरी आणि दारू मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यातून तामसा गावात निवडणुकीचा जोरदार माहौल तयार झाला आहे. त्यामुळे तामसा येथील सुज्ञ मतदार कुणाला साथ देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागल आहे. धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही निवडणूक असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.