महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षण : खासदार चिखलीकर यांच्या घरासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे 'जागर' आंदोलन - swabhimani Sambhaji Brigade Nanded

मागणीचे निवेदन चिखलीकर यांना देण्यात आले. यावेळी चिखलीकर यांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या सर्व मागण्या ऐकून येणाऱ्या काळात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक आंदोलनात, तसेच मराठा आरक्षण प्रश्नाला भाजपाचा पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली.

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जागर आंदोलन
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जागर आंदोलन

By

Published : Oct 7, 2020, 7:59 PM IST

नांदेड - मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवावी, तसेच नोकर भरती थांबवावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या घरासमोर जागर आंदोलन करण्यात आले. सत्तेतील आणि विरोधी पक्षातील झोपलेल्या लोकप्रतिनिधींना संविधानिक मार्गाने जागे करण्यासाठी हे जागर आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात असून न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आहे. या स्थगितीला पूर्णपणे राज्य सरकार, केंद्र सरकार व मराठा आरक्षण कृती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जबाबदार आहेत. केंद्र सरकारनेसुद्धा राज्यात स्वपक्षाचे सरकार नसल्या कारणाने राज्य सरकारला सहकार्य केले नाही. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागले. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी आरक्षण प्रश्नी लोकसभेत प्रश्न मांडून तो लवकरात लवकर सोडवावा, असे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. येणाऱ्या काळात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देवसरकर यांनी दिला आहे.

मागणीचे निवेदन चिखलीकर यांना देण्यात आले. यावेळी चिखलीकर यांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या सर्व मागण्या ऐकून येणाऱ्या काळात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक आंदोलनात, तसेच मराठा आरक्षण प्रश्नाला भाजपाचा पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, डॉ. बालाजी पेनूरकर, प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मंगेश पाटील कदम, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा-मराठा आरक्षण : नांदेडमध्ये भाजपा आमदार रातोळीकर यांच्या घरासमोर 'जागर आंदोलन'-

ABOUT THE AUTHOR

...view details