दूध दराबाबत नांदेडमध्ये बैलांना दुधाने आंघोळ घालत स्वाभिमानीचे आंदोलन - nanded swabhimani news
दूध दरवाढ व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यात आंदोलन करण्यात आले.
नांदेड- दूध दरवाढीबाबात नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचा निषेध करत बैलाला दुधाने अंघोळ घालण्यात आली. हे आंदोलन प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच धानोरा गावातील हनुमान मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला व सरकारला सदबुद्धी दे, असे साकडे घालण्यात आले.
जिल्ह्यातील विविध तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दूध दरवाढ मिळालीच पाहिजे, अशा घोषणाही उपस्थित शेतकऱ्यांनी दिल्या. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे, युवा जिल्हाध्यक्ष नरहरी पोपळे, तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, गोविंदराव जोगदंड व शेतकरी उपस्थित होते.